Belagavi

बेळगावात ‘आरएलएस’मध्ये राष्ट्रध्वज संहितेवर व्याख्यान 

Share

बेळगावातील केएलएस संस्थेच्या राजा लखम गौडा कायदा महाविद्यालयात रविवारी राष्ट्रीय ध्वज संहितेवर विशेष व्याख्यान आयोजित केले होते.

माजी विद्यार्थी संघटना आणि जिमखाना युनियनतर्फे आरएलएस तथा राजा लखम गौडा कायदा महाविद्यालयात एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. “द हिंदू” वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी ऋषिकेश बहादूर देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना ऋषिकेश बहादूर देसाई यांनी, 2002 च्या भारतीय ध्वज संहितेची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असावा. ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो. परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 3:2 असावे. दुसरा, ध्वज उघड्यावर प्रदर्शित केल्यास, हवामानाची पर्वा न करता तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शक्य तितका फडकवावा. योग्य ठिकाणी आणि स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने राष्ट्रध्वज फडकावला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. ए.एच. हवालदार यांनी देशभक्ती आणि ध्वजसंहितेविषयी सांगितले. ध्वजसंहितेचा तपशील संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

या प्रसंगी डॉ. डी. प्रसन्नकुमार, वैष्णवी कलबुर्गी, प्रियांका राव, स्नेहा कुलकर्णी, शुभा मुरगोड, मानसी जिगजिन्नी आदी उपस्थित होते.

Tags: