Accident

पंतनगरजवळ टिप्परच्या धडकेत दोन युवक ठार

Share

बेळगावबागलकोट रस्त्यावरील पंत बाळेकुंद्री येथील पंतनगरजवळ शनिवारी रात्री भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला.

बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावातील सोमय्या प्रभू खवशी (वय 22) आणि मूळचा कित्तूर तालुक्यातील शिवनूर गावातील आणि सध्या सुळेभावी येथील रहिवासी असलेल्या विठ्ठल गणपती डवळी (वय 22) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

हे युवक बेळगावहून सुळेभावीकडे येत असताना समोरून आलेल्या टिप्परने त्यांना धडक दिली. या धडकेत दुचाकी टिप्परखाली अडकली. यात विठ्ठल डवळीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण सोमय्या गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने रात्री त्यांचा मृत्यू झाला.

Tags: