Belagavi

बेळगावमधील कर्नाटक बँकेच्या मुख्य शाखेचे स्थलांतर

Share

बेळगाव शहरातील कर्नाटक बँकेच्या प्रमुख शाखेचे रामलिंग खिंड गल्ली येथील नूतन इमारतीत उद्घाटन करण्यात आले.

बेळगाव शहरातील कर्नाटक बँकेच्या प्रमुख शाखेचे स्थलांतर करण्यात आले असून रामलिंग खिंड गल्ली येथील नूतन इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याहस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप्रप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना असिस्टंट जनरल मॅनेजर वादिराज के म्हणाले, आमच्या बँकेची हि ४१ वि शाखा आहे. या भागातील लोकांच्या सेवेसाठी १९६६ मध्ये कर्नाटक बँकेचे विलीनीकरण झाले. या शाखेची उलाढाल १९१ कोटी रुपये इतकी असून २३ हजारहून अधिक ग्राहक आहेत. हे सर्व ग्राहकांच्या सहकार्यामुळेच शक्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना कर्नाटक बँकेचे एम डी महाबळेश्वर म्हणाले, गेल्या ५६ वर्षांपासून बँक ग्राहकांच्या सेवेत आहे. इतक्या वर्षात ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आम्हाला सर्व ग्राहकांचा आदर असल्याचे ते म्हणाले. यावेळी बँकेच्या आजवरच्या प्रवासाबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी बँकेच्या ग्राहकांनी बँकेला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास बँकेचे कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: