ड्रायव्हरच्या आगावूपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता, पण सुदैवानेच ते बचावल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे.
विजापूर जिल्ह्यामध्ये सरकारी बसचा अपघात थोडक्यात हुकला. ड्रायव्हरने पुराच्या पाण्याच्या धोक्याची पर्वा न करता पुलावरून बस चालवली. देवरहिप्परगी तालुक्यातील सातीहाळ गावातील डोणी नदीवरील पूल पुरात बुडाला आहे.
मात्र चालकाने पुराचा धोका लक्षात न घेता बस चालवली. यावेळी बसमध्ये 10 हून अधिक लोक प्रवास करत होते, एका क्षणी बस पुलावरून वाहून जाते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पूरग्रस्त पुलावर बस पाहून प्रवाशी चांगलेच घाबरले. चालकाने मात्र प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत बस पुढे दामटली.


Recent Comments