Kagawad

मंगसुळी येथील श्री मल्लय्या मंदिर विकासकामांना प्रारंभ

Share

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील श्री मल्लय्या देवस्थानाच्या विकासकामांना आमदार श्रीमंत पाटील यांनी मंजूर केलेल्या ४.५० कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी मंगसुळी गावातील श्री मल्लय्या देवस्थानसमोर या विकासकामांना पूजनाने सुरुवात झाली.

मंगसुळी येथील श्री मल्लय्या देवस्थान हे अनेकांचे कुलदैवत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तिभावाने येथे येतात. या मंदिराच्या विकासाची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीला अनुसरून विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. आमदार श्रीमंत पाटील यांच्या निधीतून ४.५० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून या कामकाजाला आमदार श्रीमंत पाटील यांनी पूजन करून चालना दिली.यावेळी बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, मंगसुळी येथील श्री मल्लय्या मंदिर हे पुरातन काळातील मंदिर आहे. या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात, या मंदिराच्या विकासासंदर्भात मागणी करण्यात येत होती. तसेच हे ठिकाण स्वतंत्र पर्यटन स्थळ बनविण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आमदार श्रीमंत पाटील म्हणाले.

आमदार श्रीमंत पाटील यांनी मंगसुळी गावच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम आखले असून, माजी पाटबंधारे मंत्री व राजकीय नेते रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्र शासनाकडून पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. सदर कामकाज पुढेही असेच सुरु राहणार असून स्वतंत्र शासकीय पदवीधर महाविद्यालय, अग्निशमन दल, ११० केवी वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आल्याचे आमदार श्रीमंत पाटील यांनी सांगितले.

श्री मल्लय्या देवस्थानचे ट्रस्टी उज्वल सिंग पवार देसाई बोलताना म्हणाले, आजवर या मंदिराच्या विकासासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरवले नाही. मात्र श्रीमंत पाटील यांनी ४.५० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले असून सर्व भाविकांच्या वतीने त्यांचे आभार मानले.

यावेळी देवस्थानचे ट्रस्टी संचालक विक्रम सिंग पवार देसाई, मयूर सिंग पवार देसाई, अशोक पाटील, एपीएमसी संचालक रवींद्र पुजारी, दादा पाटील, अभय पाटील, संभाजी पाटील, सुधाकर भगत, राजेंद्र पोतदार, अधिकारी प्रशांत गाणीगेर, प्रशांत पोतदार, प्रवीण हुणसिकट्टी, कंत्राटदार विजय पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, मुकुंद पुजारी आदी उपस्थित होते.

Tags: