गेल्या आठवडाभरापासून संततधार पडत असलेल्या मुसळधार पावसाने चिक्कोडी तालुक्यातील शेतकरी अक्षरश: हैराण झाला आहे. चांगली उगवण झालेली पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत पेश आहे एक खास रिपोर्ट !

नदीप्रमाणे शेतात साचलेले पाणी, मुसळधार पावसाने कुजलेली पिके, होय, गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या शेतात पाणी साचल्याने पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. येडूर, चंदुर, कल्लोळ, इंगळी, मांजरी येथील शेतात सोयाबीन, शेंगा, ऊस, वाटाणा, उडीद, मका यासह अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. विविध गावांतील शेकडो एकर शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. नुकसान झालेल्या पिकाची शासनाने योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या शेतात जून महिन्यात पावसाचे पाणी साचले तर ऑक्टोबर व नोव्हेंबरपर्यंत पाणी साठते. यामुळे नंतर कोणतेही पीक घेणे कठीण होते. यासाठी शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पिके लुटली आहेत. कष्टाने पिकवलेली पिके हाताला लागतील ही शेतकऱ्यांची अशा धुळीला मिळाली आहे. शेतकऱ्यांचे जीवन दयनीय झाले आहे.
एकंदरीत गेल्या आठवडाभरापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील शेतात पाणी साचून पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करेल का, याची प्रतीक्षा करावी लागेल.


Recent Comments