Hukkeri

हुक्केरी तालुक्यात “हर घर तिरंगा” यशस्वी करणार : तहसीलदार  

Share

हुक्केरी तालुक्यात १३ ऑगस्टपासून प्रत्येक गावातहर घर तिरंगामोहिमेंतर्गत राष्ट्रध्वज फडकावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी सांगितले.

75 व्या स्वातंत्र्यदिनाचा एक भाग म्हणून आज विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी आणि प्रत्येक शहर आणि गावात संस्थांची कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. तालुका पंचायत मुख्याधिकारी उमेश सिदनाळ यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी यापूर्वीच बचत गटांच्या  सदस्यांसोबत बैठक घेतली आहे. प्रत्येक गावांसाठी लागणारे राष्ट्रध्वज ग्रामपंचायतींमार्फत खरेदी करण्याची व्यवस्था केली आहे.

यावेळी तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, नगराध्यक्ष ए.के.पाटील, नगरपंचायत सदस्य व नेते उपस्थित होते.

Tags: