Belagavi

सेंटपॉल्ससमोर रस्त्याऐवजी फुटपाथवर वाहने पार्क

Share

बेळगावातील कॅम्प परिसरात रस्त्याऐवजी फुटपाथवर वाहने पार्क केल्याने फुटपाथऐवजी रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

होय, बेळगावात अपघातांचे प्रमाण आधीच वाढले आहे. अशा अपघातांमध्ये बहुतांश शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहे. आता अशा अपघातांचे आणखी एक कारण ठरेल अशी बाब समोर आली आहे. पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या फूटपाथचे आता पार्किंग स्लॉटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेळगावच्या कॅम्प परिसरातील सेंट पॉल हायस्कूल समोरील फूटपाथ. या फूटपाथवर वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना फूटपाथ सोडून रस्त्यावर चालावे लागत आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून फुटपाथवर कार व अन्य वाहने उभी करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.

Tags: