मनपा निवडणुकीला १ वर्ष उलटत आले तरीही अद्याप महापौर उपमहापौर निवडणूक न झाल्याने आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगावमधील भाजप आमदारांवर टोला लगावत बेळगावमधील दोन आमदार अनधिकृतपणे महापौर उपमहापौरपदी कार्यरत असल्याची टीका केली आहे.
शनिवारी काँग्रेस भवन येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलतहोते. विधानसभा निवडणुकीची वेळ येऊन ठेपली तरी अद्याप महापौर उपमहापौरांची निवड झाली नाही. या पदावर अनाधिकारउतपणे आतापर्यंत स्थानिक आमदार कार्यरत असून त्यांना ९ ऑगस्ट रोजी केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्याहस्ते गाऊन देण्यात येतील, असा टोला त्यांनी लगावलाय.
मनपावर निवडून आलेले नगरसेवक महापौर उपमहापौर निवड न झाल्याने नाराज आहेत, अशी माहिती आहे. भाजप नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का याबाबत अद्याप मला माहिती नसून याबाबत केवळ चर्चा सुरु असल्याचे जारकीहोळी म्हणाले. 
दावणगेरे येथील सिद्धरामय्या महोत्सवामुळे काँग्रेसला नवी बळकटी आली असून हा एक ऐतिहासिक मेळावा असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमामुळे आगामी निवडणुकीसाठी नवी उभारी मिळणार असल्याचा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
बेळगाव काँग्रेसमध्ये फिरोज सेठ आणि सतीश जारकीहोळी यांच्यात असलेल्या वैराबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले कि, प्रत्येक पक्षात लहान मोठे मतभेद असतातच. जाधव नगर येथे आलेला बिबट्या हा आमच्यात वाटाघाटी करण्यासाठी आलेला नसून महागाई संदर्भात भाजपचे कान खेचून समजावण्यासाठी आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
माजी मंत्री जमीर अहमद यांच्या कार्यक्रमास कोणीही काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित नव्हते असा आरोप फिरोज सेठ यांनी केला असून भाजप प्रणित मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित नव्हते पण काँग्रेस कार्यकर्ते हे जमीर अहमद यांचे समर्थक आहेत. जमीर अहमद यांना मी विचारले असता, आपणही त्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून गेलो होती, आपण त्या कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते असे जमीर अहमद यांनी सांगितले असे जारकीहोळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीला ८ महिने बाकी आहेत. यमकनमर्डी मतदार संघात मंत्री उमेश कत्ती, दक्षिण मतदार संघात अभय पाटील, यांना प्रभारीपद देण्यासंदर्भात आपल्याला १ वर्षांपूर्वीच माहिती होत्ते, असे जारकीहोळी म्हणले.


Recent Comments