कर्नाटक लॉ सोसायटी संचालित गोगटे कॉमर्स कॉलेजच्या वतीने प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावमधील गोगटे कॉमर्स कॉलेजच्या वाणिज्य, आयक्यूएसी, आणि हॉबी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनाचे तसेच फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी येथील के एल एस च्या नूतन विपीपी इमारतीत शनिवार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. 
या कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना प्रा. दीपा तंगणकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात कला प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ५० हुन अधिक स्टॉल्स ची व्यवस्था करण्यात आली असून यापैकी ४० स्टॉल्स खाद्यपदार्थांचे तर १० स्टॉल्स आर्ट एक्सिबिशनशी निगडित आहेत. व्याबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. 
या महोत्सवासंदर्भात लक्ष्मी पाटील या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, कोरोनानंतर अशापद्धतीने कार्यक्रम भरविण्यात आल्याने आपल्याला आनंद झाला आहे. या कार्यक्रमामुळे आमच्यात एक उत्तम वातावरण तयार झाले असून असे कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयात आयोजित केले जात नसून आपले महाविद्यालय हे एक उत्तम महाविद्यालय असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. 
या कार्यक्रमात प्राचार्य एच एच वीरपूरकर, चेअरमन ए के तगारे, आयक्यूएसी को ओर्डीनेटर प्रो निवास माळूगे, न्याक को ओर्डीनेटर डी बी कामकर, दीप तंगणकर, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रो. ए आर नेरलकेरी, रवी टोन्नी, गौतमी देशपांडे, विघ्नेश नाईक, वैदेही कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments