गॅस गळतीमुळे ओमिनी कारने रस्त्याच्या मधोमध पेट घेतल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात घडली.
संकेश्वर शहरातील बसस्थानकाजवळ आज, शुक्रवारी सकाळी ओमिनी कारमध्ये धूर दिसून आला.त्यामुळे चालकाने ओमिनी कार थांबवली. सुदैवाने चालक व प्रवासी बाहेर पडल्यावर कारने पेट घेतला. यात संपूर्ण ओमिनी कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. आगीची दुर्घटना घडली त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. काही काळ या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धुराचे लोट दिसताच गाडीतील प्रवासी तत्काळ बाहेर आले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवली. ही घटना संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments