विजापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून डोणी नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून विजापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे विजापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांतून वाहणारी डोणी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी शिरले आहे. पावसामुळे डोणी नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी हादरला आहे. डोणी नदीच्या आजूबाजूच्या जमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. बबलेश्वर तालुक्यातील सारवाड गावात डोणी नदी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरली आहे.
शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. जिल्ह्यातील तिकोटा, बबलेश्वर, बागेवाडी, देवरहिप्परगी, ताळीकोटे या तालुक्यांमध्ये वाहणाऱ्या या डोणी नदीने आता मोठी दुरवस्था निर्माण केली आहे. नदीच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.


Recent Comments