केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चिक्कोडी येथील केएलई संस्थेच्या संलग्न संस्थांतर्फे आज सायकल रॅली काढण्यात आली.
केएलई संस्थेचे संचालक बसवराज पाटील आणि चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना, चिक्कोडीचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना केएलई संस्थेचे आजीव सदस्य आणि केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद रामपुरे म्हणाले की, डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चिक्कोडी येथील केएलई संलग्न संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी “स्वस्थ भारत, समृद्ध भारत”चा नारा देत या रॅलीत सहभाग घेतला. B
सी. बी. कोरे पॉलिटेक्निकपासून सुरू होऊन बसवेश्वर सर्कलमार्गे बसस्थानक आणि तेथून केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत 7.5 किमी अंतरापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीत हेस्कॉमचे संचालक महेश भाटे, हुबळी, प्राचार्य प्रा. उदयसिंह राजपूत, प्रकाश पी कोळी, प्रा. दुंडाप्पा सोलापुरे, प्रा. व्यंकट रेड्डी, प्रा. अमर पशुपती मठ, प्रा. चेतन अलवाडे, प्रा. विनायक पाटील, विभागप्रमुखांसह 300 हून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.


Recent Comments