Belagavi

कॉ. चन्नबसप्पा जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Share

महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक कॉ. चन्नबसप्पा हे एक महान देशभक्त आणि मानवतावादी लेखक होते, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना दिलेल्या सुविधा नाकारल्या आणि साहित्याची जोपासना करत साहित्य चळवळीत योगदान दिली, त्यांचा आदर्श आजच्या जनतेने घयावा, असे प्रतिपादन डॉ. मल्लिकार्जुन छब्बी यांनी केले.बेळगावमध्ये एस जी बाळेकुंद्री इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या सभागृहात कॉ. चन्नबसप्पा जन्मशताब्दी समिती, बेंगळूर, शरण साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा घटक तसेच नागनूर रुद्राक्षी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ चन्नबसप्पा जन्मशताब्दी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉ चन्नबसप्पा यांच्या वैचारिक भूमिकेवर डॉ. मल्लिकार्जुन छब्बी यांनी व्याख्यान दिले . कर्नाटक एकीकरणात चळवळीतील कॉ. चन्नबसप्पा यांचा सहभाग, न्यायाधीश म्हणून बजाविलेली सेवा तसेच त्यांनी केलेली समाजसेवा या सर्व गोष्टी नेहमीच स्मरणात राहतील असे मत डॉ. मल्लिकार्जुन छब्बी यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास तोंडदार्य मठाचे जगद्गुरू डॉ. सिद्धाराम महास्वामी यांचे दिव्यसानिध्य लाभले. यावेळी स्वामींनी कॉ. चन्नबसप्पा यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.

या कार्यक्रमास साहित्यिक डॉ. बसवराज जगजंपी, बेंगळूर मधील कॉ. चन्नबसप्पा साहित्य आणि शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमती शांता जयप्रसाद, के आय गुदगी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जिनदत्त देसाई हे होते.यावेळी बी एस गवीमठ, बसवराज रोटी, प्रेमाक्का अंगडी, एफ व्ही मानवी आदी उपस्थित होते.

Tags: