Khanapur

अवरोळी मठात उद्या भारतमातेच्या पुतळ्याचे अनावरण

Share

खानापूर तालुक्यातील अवरोळी येथील श्री रुद्र स्वामी मठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताचा ८५ इंचाचा नकाशा तयार करण्यात आला असून त्याच्या मध्यभागी भारतमातेची ७५ इंची मूर्ती तयार करण्यात आली आहे.

त्याचे अनावरण उद्या शनिवारी सकाळी वाजता समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती रुद्र स्वामी मठाचे श्री चन्नबसव देवरु यांनी दिली. यासंदर्भात माहिती देताना रुद्र स्वामी मठाचे परमपूज्य श्री चन्नबसव देवरु यांनी सांगितले की, भारताच्या नकाशाचे आणि भारतमातेच्या पुतळ्याचे अनावरण उद्या 6 तारखेला सकाळी 9 वाजता श्री रुद्र स्वामी मठात होणार आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सर्व भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. बाइट

Tags: