बेळगावातील फलोद्यान खात्याचे सहाय्यक संचालक राजकुमार टाकळे आता अडचणीत आले आहेत. राजकुमार टाकळे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे टाकळे आपले पती असल्याचा दावा करणाऱ्या नव्यश्री राव यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्या नव्यश्री राव यांचा काँग्रेस नेत्यांसोबतचा फोटो आणि टाकळे यांच्यासोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या संदर्भात नव्यश्री राव यांनी राजकुमार टाकळे यांच्यावर अनेक आरोप करून बेळगावातील एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकुमार टाकळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा आढावा घेत अर्ज फेटाळून लावला. न्या. अनंत एच. यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा आदेश दिला.
नव्यश्री राव यांनी बेळगाव एपीएमसी स्थानकात टाकळे यांच्यावर बलात्कार, गर्भपात आणि शारीरिक अत्याचारासह 10 हून अधिक आरोपांसह तक्रार दाखल केली. या संदर्भात टाकळे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यापूर्वी टाकळे यांनीही काँग्रेस कार्यकर्त्या नव्यश्रीवर ब्लॅक मेल आणि हनी ट्रॅपची तक्रार दाखल केली आहे.
Recent Comments