Belagavi

एसडीपीआय, पीएफआयवर बंदीसाठी बेळगावात श्रीराम सेनेची निदर्शने

Share

एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी श्री राम सेनेतर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली.

श्री राम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रवी कोकितकर म्हणाले, एसडीपीआय आणि पीएफआय या मुस्लिम संघटना देशद्रोही कारवाया करत आहेत. राज्यातील खून आणि दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांवर लवकरात लवकर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.निदर्शनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या आंदोलनात श्री राम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: