Belagavi

जिल्हा कसाप वतीने ‘दत्तीनिधी’ कार्यक्रम

Share

वचन साहित्यामुळे जागतिक साहित्याचे मूल्य वाढले आहे. कन्नड सहायताणे जागतिक साहित्य समृद्ध झाले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या प्रेमाक्का अंगडी यांनी केले.

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे गिरीवरी बेळगाव जी ए कॉलेज, कन्नड साहित्य परिषदेतर्फे दिवंगत एस व्ही बागी, दिवंगत स ज नागलोतीमठ, दिवंगत एन के इंचल दततिनिधी (धर्मादाय) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रेमाक्का अंगडी यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी वचन साहित्याशी निगडित व्याख्यान त्यांनी दिले. वचन साहित्य आत्मसात केल्यास मनुष्याला शास्त्र समजू शकेल, भेदभाव विरहित आयुष्य जगता येईल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी बैलहोंगल प्रथम श्रेणी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एफ दि गड्डीगौडर बोलताना म्हणाले, वचन साहित्य हे अतिशय समृद्ध असे साहित्य आहे. जगातील ३४ भाषांमध्ये वचन साहित्य उपलब्ध आहे. आपण धर्मग्रंथ वाचतो परंतु तर्कशुद्धपणे जीवन जगत नाही. विचारांनी मनुष्याचे मूल्य वाढते, मनुष्याचे व्यक्तिमत्व घडते असे विचार त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बैलहोंगलचे प्रसिद्ध वैद्य डॉ. बी एस महंतशेट्टी यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर बोलताना महांतेशेट्टी यांनी लहानपणापासूनच साहित्य परंपरा रुजली पाहिजे, तरच साहित्य चळवळ जिवंत राहील, असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कसाप जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड्ड यांनी कन्नड भाषेहूचे महत्व पटवून देत आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमात दततिनिधी सुपूर्द करणाऱ्या मान्यवरांचा कसाप तर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भावगीत कार्यक्रमातील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. (फ्लो)

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एम एच मारद हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चिक्कोडी नगरपालिका सदस्य विना कवटगीमठ, शाम्भवी अश्वथपूर आदी मान्यवर उपस्थित होते. लेखिका संघाच्या अध्यक्ष जयशीला ब्याकोड, वीरशैव महासभा अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, ज्योती बदामी, भारती मठद, सुरेश हांजी, वाय बी याक्कोळ्ळी, मल्लिकार्जुन कोळी, अन्नपूर्णाया कनोज, बसवराज बागी, प्रतिभा कळ्ळीमठ, गौरी कट्टी, मंगला नक्की, लक्ष्मी मंडलगीमठ, बी आर हुल्लेप्पनवार, महादेवी कारकी, बसवप्रभू हिरेमठ आदींसह कसाप जिल्हा घटकची कार्यकारी कमिटी, जी ए महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: