Athani

अथणी शहराचा विकास हे माझे ध्येय : आमदार महेश कुमठळ्ळी

Share

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच शहरात मूलभूत सुविधा पुरविण्याच्या कामाला सुरुवात करून अथणीला आदर्श शहर बनवू, असे अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी सांगितले.

133 लाख रुपयांच्या अनुदानातून शहरातील चर्मालय  कॉलनीतील विविध विकास कामांच्या शुभारंभ करून बोलताना ते म्हणाले की, अथणी शहराचा विकास हे माझे ध्येय आहे. आज झोपडपट्टी विकास महामंडळामार्फत अनेक कामांचा शुभारंभ करण्यात आला असून यापुढेही विविध ठिकाणी विकासकामे करण्यात येणार आहेत.

यावेळी डॉ. अनिल सौदागर, दिलीप लोणेरे, सुंदर सौदागर, बसवराज हल्लदमळ, रमेश पट्टन, संगमेश इंगळे, शशी साळवे, प्रकाश चन्ननवर, शिवानंद सौदागर, अशोक गाडीवड्डर आदी उपस्थित होते.

Tags: