चिकोडी परिसरातील श्रीमती ए ए पाटील महिला विद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

गेल्या ३५ वर्षांपासून महाविद्यालयात सेवा बजाविणाऱ्या डॉ. डी एम कुलकर्णी यांचा महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी यांच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सीटीई संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जहागीरदार यांनी डॉ. डी. एम. कुलकर्णी यांना पुढील आयुहस्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवृत्त प्राचार्या जयश्री नागराळे यांनीही डॉ. डी. एम कुलकर्णी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी आपल्या कार्यकाळात बजाविलेल्या सेवेचे, विद्यार्थ्यांशी असलेल्या नात्याचे कौतुक केले.
श्रीमती ए ए पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य एल एस पडतारे यांनी डॉ. डी एम कुलकर्णी यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे कौतुक करत प्रत्येकाशी मनमिळावू वृत्तीने वागण्याचे कौतुक केले.
सेवानिवृत्तीबद्दल सत्कार स्वीकारल्यानंतर डॉ. डी एम कुलकर्णी यांनी आपल्या कार्यकाळात आपल्याला मदत केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी निवृत्त प्राचार्य ए जी कुलकर्णी, ए डी कुलकर्णी, श्रीमती व्ही जी कुलकर्णी, व्ही टी बिक्कण्णावर, बी बी पाटील, एच ए बोगले, एस सी जकाती, एस के जोशी, व्ही व्ही नायक आदी उपस्थित होते.


Recent Comments