चिक्कोडी तालुक्यातील चंदूरटेक गावाच्या हद्दीत काल रात्री एक बिबट्या पुन्हा ग्रामस्थांच्या नजरेस पडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. काल, बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चंदूरटेक गावच्या रस्त्याच्या कडेला पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले.
गावातील युवक एका कारमधून जात असताना रस्त्याच्या कडेला बिबट्याने दर्शन दिले. हे दृश्य त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केले. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे.
त्यामुळे बिबट्या उसाच्या शेतातून रस्त्यावर फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पुन्हा बिबट्याने हजेरी लावल्याने चंदूरटेक गावासह आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या दिसलेल्या ठिकाणी भेट देऊन बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला आहे.


Recent Comments