Belagavi

अवजड वाहनचालकांमध्ये जनजागृती

Share

बेळगावमध्ये लागोपाठ झालेल्या २ अपघातानंतर प्रशासन, पालक आणि नागरिकांमध्ये जागरूकता दिसून येत असून समाजसेवक प्रसाद चौगुले यांच्या पुढाकाराने आवाज अवजड वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

व्हॉइस : गेल्या चार दिवसात लागोपाठ २ ठिकाणी झालेल्या अपघातात २ विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आज समाजसेवक प्रसाद चौगुले यांनी अवजड वाहनधारकांमध्ये जनजागृतीचे काम केले आहे.

बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या संख्येतही वाढ होत आहे. या अपघातात मुलांचे बळी जात असल्याचे प्रकार घडत असून बेळगावमधील फोर्ट रोड आणि कॅम्प परिसर अशा दोन ठिकाणी अपघात झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला असून या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये जनजागृती करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी अवजड वाहनधारकांना सावकाश आणि सुरक्षितपणे वाहने चालविण्यासंदर्भात सूचना देत जागृती केली. शहरातील जवळपास प्रत्येक मार्गांवर शाळा महाविद्यालये असून मद्यपान करून वाहने चालवू नये, अतिवेग टाळावा, सुरक्षितपणे वाहने चालवावीत यासह अवजड वाहनधारकांनी बेदरकारपणे वाहन चालविल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सूचित केल्याचेही प्रसाद चौगुले यांनी सांगितले. ()

Tags: