नकली पत्रकारांचा उपद्रव टाळण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य घ्यावे असे आवाहन बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी केले.
हुक्केरी येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, निप्पाणीजवळील कुर्ली गावात वार्ताहर असल्याचे सांगून तिघाजणांनी एकटी महिला राहत असलेल्या एका घरात घुसून, तुम्ही रेशनचा तांदूळ तुमच्या घरात साठवून ठेवला आहे, याचे व्हिडीओ चित्रण करून प्रसारित करणार असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. संबंधित महिलेने त्यांना न कळत त्यांचे मोबाईलवर गुप्तपणे चित्रीकरण करून निपाणी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अशा पद्धतीने जर कोणी येऊन आम्ही पत्रकार असल्याचा दावा करून पैशाची मागणी करत असेल किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही ताबडतोब 112 वर कॉल करून तक्रार करा आणि पोलिसांचे सहकार्य घ्या असे आवाहन एसपी डॉ. पाटील यांनी केले. बाईट यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी, गोकाक डीएसपी मनोजकुमार नायक, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक रफीक तहसीलदार उपस्थित होते.


Recent Comments