Vijayapura

तब्बल 116 किलो गव्हाचे पोते उचलून 9 किमी अंतर पार

Share

बाहुबली चित्रपटात तुम्ही खूप मोठे शिवलिंग उचलताना पडद्यावरच्या बाहुबलीला पाहिले आहे. पण येथे एका खऱ्या बाहुबलीने साहसी स्टंट करून दाखवला आहे.

तब्बल 116 किलो वजनाचे गव्हाचे पोते उचलून 9 किमी अंतर पार करण्याचा विक्रम विजापूर जिल्ह्यातील एका बाहुबलीने केला आहे. प्रकाश बैरवाडगी असे या बाहुबली युवकाचे नाव आहे. तो विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुकमधील चिक्करूगी गावातील एक बलवान तरुण आहे.

त्याने देवरहिप्परगी तालुक्यातील मुळसावळगी क्रॉस ते चिक्करूगी गावापर्यंत प्रवास केला आहे. 116 किलो वजनाचे गव्हाचे पोते  घेऊन जात असताना, त्याच्या मित्रांनी त्याला टॉवेलने वारा घातला. शक्ती प्रदर्शनासाठी साहसी कामगिरी करणाऱ्या प्रकाशला मित्रांनी 50 ग्रॅम चांदीचे ब्रेसलेट दिले. प्रकाशच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: