जिल्ह्यात अनेक ठिकाणी आतापर्यंत विविध युट्युब चॅनेल्स, आणि अनधिकृत पत्रकारांची संख्या वाढली आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी पुढे येत असून याबाबत माहिती विभागाच्या यादीतील प्रसारमाध्यम संस्थेत कार्य करणाऱ्या पत्रकारांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
व्हॉइस : अनधिकृत पत्रकारांकडून ‘प्रेस’ नावाचा गैरवापर होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.
प्रसारमाध्यमांकडून दिलेल्या शिफारस पत्राच्या आधारे त्या संस्थेतील पत्रकाराला जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र दिले जाईल, आणि केवळ ओळखपत्र असणाऱ्या वक्तींनाच सरकारी कार्यक्रमात तसेच सभांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. याबाबतची माहितीही सर्व विभागांना देण्यात येणार असून प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील प्रसारमाध्यम संस्थांनी आपल्या संस्थेतील वार्ताहराचे नाव, ओळखपत्र आणि इतर तपशील येत्या आठवडाभरात माहिती विभागाकडे पाठविल्यास त्यांना ओळखपत्र दिले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वृत्त विभागाच्या माध्यम सूचीतील तालुकास्तरीय वार्ताहरांनाही माध्यम संस्थेच्या शिफारशीच्या आधारे तहसीलदार आणि वृत्त विभागामार्फत ओळखपत्र दिले जाईल. संबंधित तालुक्याच्या पत्रकारांना देण्यात येणारे ओळखपत्र केवळ संबंधित तालुक्याच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित असेल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच यूट्यूब चॅनेल आणि सोशल नेटवर्क्सना कोणत्याही कारणास्तव ओळखपत्र दिले जाणार नाही, असेहि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम.बी.बोरलिंगय्या म्हणाले, केवळ वृत्त संकलन करणाऱ्यांनाच सदर ओळखपत्र देण्यात येणार असून संबंधित संस्थेत काम करणाऱ्या इतर व्यक्तींना या ओळखपत्राची गरज बहसणार नाही. ()
अधिकृत पत्रकारांच्या यादीच्या आधारे ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी सांगितले. कोणत्याही माध्यम संस्थेचे शिफारसपत्र वापरून ओळखपत्र मिळवणाऱ्या पत्रकारांनी त्यांच्या खासगी यूट्यूब चॅनेलसाठी काम केल्यास त्याला संबंधित संस्था जबाबदार असेल, असेही ते म्हणाले.()
यावेळी स्वयंघोषित मीडिया, युट्युब चॅनेल आणि बनावट पत्रकार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेक माध्यम प्रतिनिधींनी एकमताने केली.
यावेळी राजू गवळी, राजशेखर पाटील, चंद्रू श्रीरामुडू, सहदेव माने, महांतेश कुरबेट, मेहबूब मकानदार, श्रीशैल मठद, संतोष श्रीरामुडू, राजशेखर हिरेमठ, जगदीश विरक्तमठ, मंजुनाथ पाटील, श्रीधर कोटारगस्ती आदींनी यूट्यूब चॅनल बनवून स्वयंघोषित बनलेल्या पत्रकारांमुळे संपूर्ण प्रसारमाध्यमांनाच वाईट अनुभव येत असल्याचे सांगितले.
माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर यांनी प्रास्ताविकात बोलताना विभागामार्फत यापूर्वीच जारी करण्यात आलेल्या ओळखपत्रांची माहिती दिली.या बैठकीत सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आणि छायाचित्रकार सहभागी झाले होते.


Recent Comments