Vijayapura

विजापुरातील नलतवाड येथे विहिरीत आढळली मगर 

Share

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नलतवाड येथील चिनीवालर प्लॉट येथे विहिरीत मोठी मगर सापडल्याची घटना घडली आहे.

महांतेश नामक युवकाने आपल्या मोबाईलवर मगरीच्या व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ही भली मोठी मगर पाहून प्लॉटमधील रहिवासी घाबरले आहेत. याआधीही या विहिरीत मगर दिसल्याची बातमी आली होती.

आता पुन्हा ही मगर दिसली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडून अन्यत्र सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags: