चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन ग्राम पंचायत अध्यक्षा शैलजा सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

वाचकांच्या सोयीसाठी चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात ग्राम पंचायत अनुदानातून नवीन डिजिटल वाचनालय सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षा शैलजा सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, वाचकांची वाचनाची तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या अनुदानातून डिजिटल वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
तरुण पिढीने वाचनाची आवड जोपासली पाहिजे. नवीन साहित्याची पुस्तके वाचा आणि आपले ज्ञान वाढवा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामपंचायत सदस्य रंजित शिरशेट यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष आण्णाप्पा हारके, ग्रा. पं. सदस्य सुरेश पाटील, विक्रम शिरशेट, विकास पाटील, विवेक कमते, पांडुरंग वड्डर, ज्योतेप्पा कोकणे, अल्लाबक्ष पटवेगार, केदारी कमते, ग्रापं. विकास अधिकारी विनोद आसोदे, एस. व्ही. गवी, संतोष भंडारे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments