मद्यधुंद तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिक्कोडी शहरातील हालट्टी येथे घडली आहे.

गौसमोमीन मुस्तफा जमादार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दारूच्या नशेत काल रात्री घरात झालेल्या वादानंतर बाहेर पडलेल्या युवकाने हे पाऊल उचलले आहे. घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन सदर युवकाने आपले जीवन संपविले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर मृत युवकाच्या कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला.
रात्रीपासूनच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधकार्य हाती घेतले होते. सकाळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशामक दलाच्यावतीने मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. घटनास्थळी पीएसआय यमनाप्पा मांग यांनी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असून सदर घटना चिकोडी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.


Recent Comments