आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना कचरा संकलन वाहने बुधवारी सुपूर्द करण्यात आली.

खानापूर तालुका पंचायत आवारात आयोजित कार्यक्रमात आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना घनकचरा विल्हेवाट लावणाऱ्या वाहनांचे वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित ग्रामपंचायत अध्यक्ष व पीडीओ यांच्या उपस्थितीत घनकचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या चाव्या चालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी बोलताना आमदार अंजली निंबाळकर यांनी या वाहनांचा गावाच्या स्वच्छतेसाठी योग्य वापर करावा, अशी सूचना केली. ग्रामपंचायतीतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबाबत व कामकाजाबाबतच्या तक्रारी त्यांनी तापं मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी तालुका पंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.


Recent Comments