श्रावण मासानिमित्त केदनूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भजन आणि पूजा कार्यक्रमादरम्यान माजी सैनिकाने येऊन माईक तोडल्याचा प्रकार घडला आहे. सदर माजी सैनिकाने येथील भाविकांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ देखील केली असून याप्रकरणी न्याय मागण्यासाठी केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
केदनूर गावातील विठ्ठल रखुमाई देवस्थानात सुरु असलेल्या माईक चाचणी दरम्यान काहीजणांनी मंदिरात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील माईकचा तोडफोड केली. गोपाळ अण्णाप्पा संभाजी नामक एका व्यक्तीने मंदिरात येऊन भाविकांना त्रास देण्यास सुरुवात केली. हे प्रकार सातत्याने होत असून यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत धरणे आंदोलन छेडले. या व्यक्तीपासून आपल्याला संरक्षण मिळावे असा आग्रह करत केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरुद्र कोरी या ग्रामस्थाने सांगितले, श्रवणमासानिमित्त देवस्थानात पहाटे ५ वाजता काकडआरती करण्यात येते. पूजा सुरु असताना अचानक एकजण येऊन माईकचा तोडफोड करू लागला, प्रत्येकाला ओरडू लागला. गावातील बाळू गोपाळ संभाजी या माजी सैनिकाने काकडआरती दरम्यान गोंधळ घातला. हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या हिंदूला शिक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह यावेळी ग्रामस्थांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना केदनूर गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटी सदस्य, वारकरी, संत मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments