Belagavi

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या जन्मदिनानिमित्त मोफत मौखिक आरोग्य तपासणी

Share

केएलई विद्यापीठाच्या विश्वनाथ कत्ती  दंत महाविद्यालयाच्या पेरियडॉन्टोलॉजी विभागातर्फे काल जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

केएलई विद्यापीठाचे कुलगुरू आणि केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि भारतीय पेरियडॉन्टोलॉजी संस्थेचे संस्थापक डॉ.शंकवाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका काळे यांनी दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. अलका काळे यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रमांबाबत माहिती देताना सांगितले की, मौखिक आरोग्य हा शरीराच्या आरोग्याचा केंद्रबिंदू आहे. आरोग्य ही एक देणगी आहे, त्यामुळे तोंडाच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली पाहिजे.

अनेक लोक घातक व्यसनांना बळी पडून जीवघेण्या आजारांना आमंत्रण देऊन  जीव गमावत आहेत. प्रारंभी विभागप्रमुख डॉ. विनय कुंभोजकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात क्लोराक्सॉइड जेल आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी उपयुक्त बेंजो डायमाइन माऊथ वॉश यांसारखी प्रभावी मौखिक स्वच्छता औषधे वापरून तोंडाची स्वच्छता राखण्याबाबत माहिती दिली.

व्यासपीठावर डॉ. सोनल जोशी, डॉ. शैला कोठीवाले, डॉ. अंजना बागेवाडी, रेणुका मेटगुड आदी उपस्थित होते. आयसीपीए फार्मास्युटिकलच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात 100 हून अधिक कर्मचारी आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते. जनतेमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिनाभर मोफत मौखिक स्वच्छता उपचार देण्यात येणार आहेत. जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. अलका काळे व विभागप्रमुख डॉ. विनय कुंभोजकर यांनी यावेळी केले.

Tags: