बैलहोंगल शहरातील सौंदत्ती रोडवरील ग्रीन गार्डन ढाब्यावर काल रात्री झालेल्या राड्या प्रकरणी 5 आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.

बेळगाव येथील त्यांच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना, काल सोमवारी रात्री बैलहोंगल येथील ग्रीन गार्डन ढाब्यावर घडलेल्या घटनेवर एसपी डॉ. संजीव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. बैलहोंगल शहरातील सौंदत्ती रोडवरील ग्रीन गार्डन बार अँड रेस्टॉरंटमध्ये गोंधळ झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींनी ढाब्यावर गोंधळ घातला. त्यांनी तेथील मालक आणि काही कामगारांवर हल्ला केला. यावेळी आरोपींनी बार मालक व कामगार यांच्या हातावर व पाठीवर चाकू व बेल्टने वार केले. घटनेनंतर अवघ्या तीन तासांत ५ आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले की, एप्रिल महिन्यात याच ठिकाणी मारहाणीची घटना घडली होती. याबाबत तक्रार का दिल्यावरून आरोपिंनी आता ढाबा मालकाशी भांडण केले. या गोंधळादरम्यान त्यांनी बारमालकाच्या गळ्यातील साखळी हिसकावली होती. त्यावेळी 8 आरोपींवर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर काल रात्री आरोपींनी पुन्हा ढाब्यावर गोंधळ घातला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आमचे पोलीस निरीक्षक तपास करत आहेत, असे ते म्हणाले.


Recent Comments