Belagavi

दक्षिण मतदारसंघातील पथारी व्यावसायिकांना मदतीचे धनादेश

Share

आमदार अभय पाटील यांच्या हस्ते बेळगाव दक्षिण मतदारसंघातील पथारी व्यावसायिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.

बेळगावातील शास्त्रीनगर येथील पाटीदार भवन येथे आज, मंगळवारी आयोजित कार्यक्रमात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजना आत्मनिर्भर योजनेंतर्गत रस्त्यावरील व्यापाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. आमदार अभय पाटील यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी योजना राबवली आहे. दक्षिण मतदारसंघातील अनेक व्यापाऱ्यांना यापूर्वी आम्ही धनादेशाद्वारे पैसे दिले आहेत. आज आम्ही आणखी सुमारे 150 व्यापाऱ्यांना धनादेश देत आहोत. 10,000 रुपये चांगल्या कार्यासाठी वापरून परत केल्यास पुन्हा 20,000 दिले जातील. 20 हजार रुपये भरले तर 50 हजार दिले जातील. आमच्या दक्षिण मतदारसंघातील व्यापारी या योजनेचा चांगला उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी, नगरसेवक गिरीश धोंगडी, नितीन जाधव आदी उपस्थित होते.

Tags: