महिलांचे लघु उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन व्हावे या उद्देशाने चिकोडी सदलगा मतदार संघातील ४५ महिला स्वसहाय संघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते वितरित करण्यात आले.

चिकोडी तालुक्यातील एकसंबा परिसरातील अन्नपूर्णेश्वरी कल्याण मंडपात झालेल्या कार्यक्रमात आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते ४५ महिला स्वसहाय संघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की, शासनाची प्रत्येक योजना मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. महिलांच्या स्वावलंबनासाठी राज्य सरकार आर्थिक मदत करत असून मतदारसंघातील महिलांनी याचा चांगला उपयोग करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले.
यानंतर सीडीपीओ दीपा काळे बोलताना म्हणाल्या, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चिकोडी सदलगा क्षेत्रातील ४५ महिला स्वसहाय संघांना प्रत्येकी १ लाख रुपये धनादेश वितरित करण्यात आले आहेत .
यावेळी निलांबिका प्रकाश हुक्केरी, स्वप्नाली गणेश हुक्केरी, चिकोडी परिसरातील महिला प्रतिनिधी, स्वसहाय संघाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.


Recent Comments