श्रावण मास म्हटलं कि अनेक शिवालये गर्दीने फुलून जातात. पवित्र श्रावण मासात केलेली भगवान शंकराची उपासना हि फळाला येते असे अनेकांचे मानाने आहे. अनेक शिवालयांना या काळात यात्रेचे स्वरूप मिळते. श्रावण महिन्याच्या निमित्ताने बेळगावमधील कारंजीमठ येथे जनजागृतीसाठी विशेष प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांनी दिली.
बेळगाव कारंजीमठ येथे आयोजित केलेल्या प्रवचन कार्यक्रमास मुळगुंद येथील बाललीला म्हणत शिवयोगी यांच्यावर डॉ. मल्लिकार्जुन महास्वामींनी प्रवचन दिले. यावेळी बाललीला महंत शिवयोगिनीं लिंगायत समाजाला दिलेल्या लिंग दीक्षेचे महत्व त्यांनी सांगितले. कर्म आणि दान या दोन गोष्टी जीवनात किती महत्वाच्या आहेत, बाललीला महंत शिवयोगिनीं केलेले काम हे आजच्या मठाधीशांसाठी अनुकरणप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. ()
बेळगाव नागनूर रुद्राक्षी मठाचे प्रमुख डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी श्रावण महिन्यात लिंगायत मठांनी समाजातील लोकांपर्यंत जाऊन त्यांना शिवयोगाचे महत्त्व सांगावे, असे आवाहन केले.
कारंजामठाचे गुरुसिद्ध महास्वामी बोलताना म्हणाले, जाती, वर्ण वर्ग, लिंग भेदभाव न ठेवता समरस देश घडवण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यादृष्टीने दर सोमवारी होणाऱ्या व्याख्यानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संस्कार घडविण्याचे कार्य करा, असे आवाहन केले. 
कर्नाटक विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळविलेल्या डॉ. मल्लिकार्जुन महास्वामींचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरगौडा पाटील हे होते.
या कार्यक्रमास डॉ. बसवराज जगजंपी, डॉ. मैत्रेयानी गडिगेप्पगौडर, रमेश कळसन्नवर, नीलगंगा चरंतीमठ, विजयशास्त्री हिरेमठ, अप्पासाहेब विभूती, नानागौड बिरादार, शंकर बागेवाडी आदी उपस्थित होते. यावेळी कारंजामठाच्या मातृमंडळींनी तसेच अप्पाजी संगीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाणे गायिले. श्री श्रीकांत शानवाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रो. ए के पाटील यांनी आभार मानले.


Recent Comments