हुक्केरी तालुक्यातील विविध गावात असलेल्या ग्राम वन केंद्रांमध्ये अर्ज करून शासकीय सुविधा मिळवाव्यात असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी केले.

हुक्केरी मतदार संघातील विविध गावांमध्ये जनसंपर्क सभा व विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कामकाजाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर उमेश कत्ती बोलत होते. पंचायत राज अभियांत्रिकी उपविभाग हुक्केरी यांच्यावतीने कणगला गावात शासकीय वसतिगृह ते बैरापूर गावापर्यंतच्या जोड रस्त्याच्या सुधारणेसाठी तसेच मत्तीवाडे, मुडलगा, शिप्पूर, सह अनेक रस्त्यांच्या विकासकामांची सुरुवात करण्यात आली. यानंतर ग्रामस्थांशी उमेश कत्ती यांनी संवाद साधला.
यावेळी अम्मीणभावी, बोरगल्ल, केस्ती, बाडवाडी, हिटनि, राशिंग, बुगटी अलूर, हडलगा, कोणकेरी या गावात जनसंपर्क सभेत जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. हुक्केरी आणि महसूल विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या वृद्ध पेन्शन, दिव्यांग पेन्शन, बसव आवास योजने अंतर्गत मंजूर झालेली घरे यासर्वांच्या आदेश पत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, इओ उमेश सिदनाळ, अभियंते शशिधर भुसगोळ, भाजप नेते परगौडा पाटील, अशोक पट्टणशेट्टी, प्रशांत पाटील, बंडू हतनूरी, पवन पाटील, शशिराज पाटील, कंत्राटदार कदम अँड सन्स, मल्लप्पा बिसिरोट्टी, तसेच विविध गावातील ग्राम पंचायत विकास अधिकारी, अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.


Recent Comments