विविध राज्यात वाहने आणि पाण्याचे मोटर पंप चोरणाऱ्या आरोपीला विजापूर जिल्हा पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्रातील अहमदनगर शहरातील सलीम अजमल शेख याला अटक करण्यात आली.
विजापूर शहरातील इंडी रस्त्याजवळील कोरी चौकाजवळील गोडाऊन कुलूप फोडून लाखो रुपये किमतीचे पाण्याचे पंप संच त्याने चोरले आहेत. मुंबईत अटक करण्यात आलेल्या या आरोपीकडून 6,06,500 किमतीचे मालवाहू वाहन आणि 28 पाण्याचे मोटर पंप संच जप्त करण्यात आले. याप्रकरणी गांधीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments