वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पंथांचा केंद्रीय मागासवर्ग (ओबीसी) यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज आंदोलन करण्यात आले.
होय, वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पंथांचा इतर मागासवर्गीय यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने बेळगावातील राणी चन्नम्मा चौकातूनजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी “भारत देश जय बसवेश”च्या घोषणा देत आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे जिल्हा प्रभारी रुद्रण्णा होस्केरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गेल्या 60 वर्षांपासून आमचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. आमच्या संघर्षाला सर्व स्वामीजींचा पाठिंबा आहे. आमचा समाज सर्वांना एकत्र आणणारा आहे. 1989-90 मध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीदरम्यान जाट आणि यादवांनी त्याचा फायदा घेतला. ती आमच्या दक्षिण भागात कोणालाच उपयोगी पडला नाही. कारण आम्हाला योग्य माहिती दिली गेली नाही. त्यामुळे आम्ही १ ऑगस्टला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करत आहोत. पंतप्रधान मोदींनी त्वरित आमची मागणी मान्य करून आम्हाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पंथांचा केंद्रीय मागासवर्गीय (ओबीसी) यादीत समावेश करावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य व केंद्र शासनाला निवेदन देत आहोत, असे जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी सांगितले. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी माजी आमदार डॉ.विश्वनाथ पाटील, राजकुमार टोपन्नावर, एम. बी. जिरली, ज्योती भाविकट्टी, सरला हेरेकर, लीना टोपन्नावर, रमेश कळसन्नावर, विजया हिरेमठ आदींचा सहभाग होता.


Recent Comments