बेळगावातील फोर्ट रोडवरील खिमजीभाई पेट्रोल पंपाजवळ ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने एक कॉलेज विद्यार्थिनी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. साबिया शब्बीर अहमद पालेगार या १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फोर्ट रोडने भरतेश कॉलेजकडे जात असताना अकरावीत शिकणाऱ्या साबिया या कॉलेजच्या विद्यार्थिनीला एका ट्रकने धडक दिली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मार्केट पोलीस व दक्षिण वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ट्रक चालक मेहबूब याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दक्षिण वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी कृष्ण भट हे बेळगाव शहरात आयुक्त असताना त्यांनी शाळा सुरू असताना व शाळांना सुट्या सुरू असताना शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली होती. मात्र ते गेल्यानंतर शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर अंकुश राहिला नाही. यामुळे शाळकरी मुले अशा अवजड वाहनांचा बळी होणे अपरिहार्य आहे. सध्याचे शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी जनतेने केली आहे.


Recent Comments