दारू, अंमली पदार्थ आणि तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगावात आज जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कर्नाटक राज्य मद्य नियंत्रण मंडळ, माहिती व जनसंपर्क विभाग, आरोग्य, शिक्षण, कन्नड व संस्कृती तसेच समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्तरगी श्री विजय महांतेश्वर संस्थान मठ इलकलचे दि. आदरणीय लिंगैक्य डॉ.महंत शिवयोगी यांच्या जयंती निमित्त शहरातील संगोळ्ळी रायण्णा चौकातून व्यसनमुक्ती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती पदयात्रेला अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.महेश कोणी यांनी हिरवा झेंडीडा दाखवून चालना दिली.
यावेळी आमच्या इनन्यूजशी बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू, दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. त्यामुळे याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही मोहीम सुरू केली आहे. तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत व्यसनांना बळी पडू नये. त्यांनी विद्यार्थ्यांना वाईटापासून दूर राहून चांगले भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
बसवराज कट्टीमणी सभागृहापर्यंत ही जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. विविध विभागांचे अधिकारी व शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते.


Recent Comments