बुधवारी दावणगेरे येथे होणाऱ्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनप्रवास दर्शवणाऱ्या छायाचित्रांचा 3000 मीटर लांबीचा भव्य फलक बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे तयार करण्यात येत आहे.

सौंदत्तीचे काँग्रेस नेते सौरभ चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवंगत काँग्रेस नेते आनंद चोप्राचे चाहते सिद्धरामय्या यांच्या राजकीय जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारे सुमारे 500 फोटो वापरून 3000 मीटर लांब कापडावर हा फलक तयारकरण्यात गुंतले आहेत.
सौंदत्ती येथील काँग्रेस पक्षाचे नेते दि. आनंद चोप्रा यांचा मुलगा सौरभ आनंद चोप्रा, सिद्धरामय्या यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे चरित्र यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गुरू बिग बी आर्ट्स डिझाईनचे मौनेश बडिगर यांनी जे डिझाईन केले असून, त्याची छपाई सूरत येथे करण्यात आली आहे. त्यासाठी 8 लाख रुपये खर्च आला आहे. याच्या तयारीसाठी आनंद चोप्रा फॅन क्लब आणि एंकरेज ग्रुप गेल्या १५ दिवसांपासून मेहनत घेत आहेत. शामियाना कापड इचलकरंजीत मिळत नसल्याने तो सुरतला बनवावे लागलेते. सिद्धरामय्या कार्यक्रमाच्या मंचापासून 3 किमी अंतरावर या आत्मचरित्र फलकाचे उद्घाटन करतील.


Recent Comments