Athani

रामाण्णा धरिगौड यांचे कार्य कौतुकास्पद : लक्ष्मण सवदी

Share

सेवानिवृत्ती दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा करणाऱ्या रामाण्णा धरिगौड यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.

स्थानिक शिवनगी कल्याण मंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या चर्चासत्र व सत्कार समारंभाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.(फ्लो)

या सत्कार समारंभात बोलताना लक्ष्मण सवदी यांनी रामन्ना धरीगौड यांच्या कार्याचे कौतुक केले. धरीगौड यांनी आपल्या सेवाकाळात केलेली लोकोपयोगी सेवा जनतेच्या हृदयात कायम स्वरूपी घर करून राहिल, असे सांगत त्यांच्या भावी आयुष्यासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शुभेच्छा दिल्या.आमदार महेश कुमठहळ्ळी यांनी रामन्ना धरीगौड यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सेवेचे कौतुक केले. तसेच धरीगौड यांनी बजावलेली सेवा सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदर्श सेवा म्हणून मार्गदर्शन करत राहो अशा शुभेच्छाही दिल्यासत्कार स्वीकारल्यानंतर रामना धरीगौड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या सेवाकाळात सहकार्य केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले

या कार्यक्रमास श्रीकांत माकणी, उदयगौड पाटील, तहसीलदार सुरेश मुंजे, शेखर करबसपगोळ, बसगौड कागे, बसवराज तळवार, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

Tags: