पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून बेळगावमध्ये श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बेळगावच्या दक्षिण काशी श्री कपिलेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला.
मंदिरात घंटा वाजत आहे… बम बम भोले… शिव-शिव भोलेचा जयघोष होत आहे.

होय, हे दृश्य आहे बेळगावातील दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरातील. आज श्रावणातील पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात शेकडो भाविक कपिलनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दक्षिण काशीमध्ये श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या निमित्ताने भक्तीचा पूर आला होता. मंदिराची विविध प्रकारच्या फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली होती. फ्लो
पहाटेपासूनच श्री कपिलानाथांच्या दर्शनासाठी आबालवृद्ध भक्त मोठ्या संख्येने येत होते. सकाळपासूनच श्री कपिलानाथांची विशेष पूजा करण्यात आली. अभिषेक, विशेष पूजा, महामंगलाआरती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले.


Recent Comments