बेळगाव तालुक्यातील उचगाव या गावात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी विशेष भवन निर्माण करण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी २५ लाख रुपयांचा धनादेश वारकरी मंडळाकडे सुपूर्द केला आहे.
बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे गेली ३८ वर्षे श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो. सदर सोहळा खाजगी जमिनीवर आयोजित करण्यात येतो. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि युवराज कदम यांच्या प्रयत्नातून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी विशेष भवन निर्माण करण्यात येत असून या भवनासाठी २५ लाख रुपयांचा धनादेश वारकरी मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यानिमित्ताने वारकरी मंडळाच्या वतीने पंढरीनाथाच्या स्मरणार्थ भजन कार्यक्रमाचे आयोजन करून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावेळी उचगाव वारकरी मंडळाच्या वतीने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मातोश्री आणि त्यांच्या स्नुषा या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्वरी पारायण मंडळ उचगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन सोहळ्यामुळे एक वेगळी अनुभूती मिळाली, वारकरी मंडळासाठी वारकरी भवन निर्मिती होणे आवश्यक होते, असे मत युवराज कदम यांनी व्यक्त केले.
वारकरी मंडळाने केलेल्या मागणीची पूर्तता करण्यात आली असून २५ लाख रुपयांच्या खर्चातून सदर भवन निर्माण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. वारकरी संप्रदायासह इतरही धार्मिक कार्यक्रम ग्रामीण भागात आजतागायत राबविले जातात. पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे हि प्रत्येकाची आशा असते, आता उचगाव मधील वारकऱ्यांना गावातच विठ्ठल दर्शन मिळणार आहे, असे आम लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी उचगाव वारकरी मंडळाचे वारकरी, ग्रामीण काँग्रेस सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments