विजापुरात अनधिकृत खोकी, दुकाने हटविण्याची जोरदार मोहीम अजराबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई करत ही मोहीम राबविण्यात आली.
विजापूर शहरातील इटगी पेट्रोल पंपापासून ते अल अमीन रस्त्यापर्यंतची अनधिकृत खोकी-दुकाने आज जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. विजापूर महापालिका आयुक्त विजय मेक्कळकी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत दहाहून अधिक दुकाने हटविण्यात आली. महापालिकेतर्फे विजापुरात रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. दुकाने गेलेल्या दुकानदारांनी या कारवाईला विरोध केला. त्याला न जुमानता मोहीम राबविण्यात आली.


Recent Comments