Chikkodi

तरुण वकिलांनी कठोर परिश्रम घ्यावेत : न्यायाधीश सचिन मगदूम

Share

कठोर परिश्रम, ज्येष्ठ वकिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळे आजच्या तरुण वकिलांना आपला विकास साधता येईल, वरिष्ठ वकिलांच्या सहकार्यानेच मी उच्च यश संपादन करू शकलो अशी प्रतिक्रिया बेंगळुरू उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन मगदुम यांनी व्यक्त केले.

चिकोडी बार असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सत्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते .

वकिलांनी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकाव्यात, कितीही यश मिळाले तरी नवीन विचार करण्याची नव्या कामाच्या पद्धती शिकण्याची वृत्ती तरुण वकिलांमध्ये असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण चिकोडी शहरातच जन्मलो आणि येथेच मोठे झालो. याचठिकाणी माझ्या वकिली कारकिर्दीला सुरुवात झाली आणि आज मी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावत आहे. परंतु चिकोडी येथे सुरु केलेल्या कामकाजाची सुरुवात मी कधीची विसरू शकत नाही, असे न्यायाधीश सचिन मगदूम म्हणाले. ()यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष नागेश किवड म्हणाले, चिकोडी न्यायालयात आपल्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केलेल्या सचिन मगदूम यांनी कठोर परिश्रमातून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे, हि बाब संपूर्ण चिकोडी परिसरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. चिकोडी बार असोसिएशन संघाने सचिन मगदूम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळवून कामकाज करावे, असे आवाहन देखील नागेश किवड यांनी केले.

या कार्यक्रमास चरमूर्ती मठाच्या संपादन स्वामींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर, न्यायाधीश एस एल चव्हाण, वकील टी श्रीकांत, चिदानंद बडिगेर, अशोक आर एच, नागेश पाटील, सरकारी वकील आर आय खोत, बार असोसिएशन संघाचे प्रधान सचिव एल व्ही बोरांनावर, उपाध्यक्ष बी पी देशिंगे, बी एन पाटील, बी आर यादव, रवी हुद्दार, एस टी मुन्नोळी, प्रकाश अणवेकर, एस पी उत्तुरे, आर एन वाकले, एच एस नसलापुरे तसेच कर्नाटक राज्य वकील परिषदेचे सदस्य कलमेश किवड, सतीश कुलकर्णी, महेश मठपती आदी उपस्थित होते.

Tags: