Belagavi

इंडियन डेंटल असोसिएशनच्यावतीने तोंड आणि दातांच्या रोगावर पथनाट्य

Share

इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून बेळगावात तोंडाच्या व दातांच्या आजारांबाबत जनजागृती केली.

१ ऑगस्ट हा इंडियन सोसायटी ऑफ पीरियोडॉन्टोलॉजीचे (मौखिकरोग तज्ञ) जनक डॉ. जी जी शंकवाळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा मंडळ संस्थेच्या नाथजीराव हलगेकर डेंटल कॉलेज आणि इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रेल्वे स्थाकानाजवळ पथनाट्याच्या माध्यमातून तोंडाच्या व दातांच्या आजारांबाबत जनजागृती केली.यावेळी बोलताना डॉ. सचिन शिवनायकर बोलताना म्हणाले, दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तोंडाच्या व दातांच्या आजारांबाबत जनजागृती केली जाते. याबाबत आम्ही बेळगावात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शहरातील महत्त्वाच्या केंद्रांवर पथनाट्याद्वारे लोकांमध्ये, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. लोकांनी धुम्रपानापासून दूर राहावे, तोंडाची वारंवार तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ()

यावेळी डॉ. आर पी नाईक, डॉ. पुष्पा, डॉ. संदीप कट्टी, डॉ. संजीवनी हत्तरकी, डॉ. सचिता नायक, डॉ. अक्षता भट, डॉ. सत्या कुराडे, डॉ. राजेश पट्टनायक आदींसह इतर उपस्थित होते.

Tags: