Chikkodi

अंकली येथील हायटेक बस स्थानकाच्या कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते कामकाजाला चालना

Share

चिकोडी तालुक्यातील अंकली येथील हायटेक बस स्थानकाच्या कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आला.

अंकली गावात २ कोटी ४० लाख रुपये खर्चून हायटेक बसस्थानक उभारण्यात येत असून यासंबंधीच्या कामकाजाला आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, चिक्कोडी, अथणी आणि रायबाग या तीन तालुक्यांचा अंकली बसस्थानक हा केंद्रबिंदू आहे. येत्या ८ महिन्यात २ कोटी ४० लाख रुपये खर्चून येथे हायटेक बसस्थानक बांधण्यात येणार असून यात प्रवाशांसाठी उत्तम आसनव्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, दुकानगाळे, कँटीन यासह इतरही व्यवस्था पुरविण्यात येणार असून सदर कामकाज ८ महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील बोलताना म्हणाले, आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून बसस्थानकाचे कामकाज सुरु झालेले आहे. प्रवासी आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी काडा अध्यक्ष सुरेश कोरे, ग्राम पंचायत अध्यक्षा शैलजा सुरेश पाटील, उपाध्यक्ष अण्णाप्पा हरके, ग्रापं सदस्य रणजित शिरशेट, सतीश कोरे, विक्रम शिरशेट, विकास पाटील, विवेक कामटे, पांडुरंग वड्डर, ज्योतेप्पा कोकणे, अल्लाबक्ष पट्टेगार, शिवाजी कोठीवाले, केदारी कम्मे तसेच के एस आर ती सी डीसी शशिधर आदी उपस्थित होते.

Tags: