Hukkeri

मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते विविध विकासकामांना चालना

Share

अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते हुक्केरी मतदारसंघातील विविध गावांमध्ये विकासकामांचा आज शुभारंभ करण्यात आला.

शिरहट्टी केडी, सारापुर, संकेश्वर संगम राज्य महामार्ग 44 ते एलिमुन्नोळी, यादगुड्ड गेट, हंजानट्टी, अम्मनगी, कणगला, बोरगल आणि केएम आलुर पुलापर्यंतच्या रस्ते सुधारणांच्या कामांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हुक्केरी आणि जिल्हा पंचायत अभियांत्रिकी विभाग यांच्याकडील रस्ते सुधारणांच्या कामांना मंत्री कत्ती यांनी पुष्पहार अर्पण करून चालना दिली.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले की, तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे 20 कोटींची तर जिल्हा पंचायतीमार्फत 32 कोटी रुपयांची रस्ते सुधारणांची कामे सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे पीएम किसान योजनेतून प्रत्येकी १० हजार रुपये मिळणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

 

याप्रसंगी भाजपचे नेते सत्तेप्पा नाईक, गुरु कुलकर्णी, प्रशांत पाटील, रमेश कुलकर्णी, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, तापं मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गिरीश देसाई, जिल्हा पंचायत अभियंता ए. बी. पट्टणशेट्टी, प्रभाकर कामत, कंत्राटदार मल्लाप्पा बीसीरोट्टी, पी. व्ही. कदम अँड सन्स, जी.ए. जमादार, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags: