अभाविपच्या राज्यातील आंदोलनांबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. आमच्या सरकारचा निषेध म्हणून त्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ते पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करत आहेत, असे मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
बागलकोटमध्ये रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा निषेध करून माजी मंत्री रामदास आणि अभाविपच्या प्रतिक्रिया देताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, त्यांनी आमच्या सरकारचा निषेध केला असा तुमचा गैरसमज झाला आहे. देशद्रोही म्हणून काम करणाऱ्या संघटनांविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा संघटना देशात वाढू नयेत. डोकं वर काढू नये म्हणून अभाविपने आंदोलन केल्याच ते म्हणाले.
दरम्यान, नलिनकुमार कटील यांच्या कारला घेराव घातल्याबद्दल सांगितले की, एक दोन हजाराच्या जमावात काही गुन्हेगाराही असतात. दगडफेक करणे, घोषणा देणे असे सर्व काही ते करतात. देशभक्तांच्या मेळ्यात गुन्हेगारही घुसतात. आमची संघटना, आमचे कार्यकर्ते देशभक्त आहेत. त्यांच्यापैकी कोणीही देशद्रोहाचे काम केले नाही. ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. समाजात शांतता नांदावी हीच आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
याच वेळी, सिद्दरामय्यानी मुख्यमंत्री बसवराज बोम्मयिंची तुलना बॅबिलोनियन क्रूर राजा हम्मुराबीशी केल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सिद्धरामयांवर टीका केली. त्यांना करण्यासारखे असे काही काम उरलेले नाही. त्यामुळेच ते अशी नौटंकी करत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. बाइट


Recent Comments